न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात बांधला बंधारा

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

   पावसाळ्याचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शनिवारी मिलाग्रीस हायस्कूलच्या स्काऊट गाईड आणि इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत कौतुकास्पद उपक्रम राबवला. प्रशालेच्या बागेकडील पुलाजवळ आज विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या एकत्रित श्रमदानातून एक भक्कम बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमात सहभागी झालेले स्काऊट गाईडचे विद्यार्थी इयत्ता आठवीतील होते.

या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे नेतृत्व आणि मार्गदर्शन प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा यांनी केले. तसेच, या उपक्रमामध्ये स्काऊट गाईड ओरोसचे प्रमुख पदाधिकारी देखील विशेषत्वाने उपस्थित होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा बंधारा बांधण्याचे काम यशस्वीरित्या पार पडले. जलसंवर्धनाच्या या प्रत्यक्ष कृतीवर आधारित उपक्रमात इयत्ता आठवीतील स्काऊट गाईडचे विद्यार्थी, इको क्लबचे विद्यार्थी आणि सर्व शिक्षक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी माती आणि दगडांच्या साहाय्याने हा बंधारा उभा केला. पाण्याचे महत्त्व केवळ पुस्तकातून न शिकता प्रत्यक्ष कृतीतून निसर्गाचे रक्षण कसे करावे, याचा उत्कृष्ट धडा या विद्यार्थ्यांनी समाजाला दिला आहे. शाळा प्रशासनाने आणि विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे