पंढरपूर येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयास मंजूरी
सोलापूर/
पंढरपूर येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयास मंजूरी मिळाली आहे. या कार्यालया अंतर्गत पंढरपूरसह सांगोला, माळशिरस, मंगळवेढा,माढा आणि करमाळा या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. पंढरपूर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आले आहे.
अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाल्याने जिल्हा निर्मितीसाठी टाकलेले पहिले पाऊल आहे,अशी प्रतिक्रिया आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.


