निवडणूक काळात प्रत्येक जण भेटायला येतो… कुणालाही नाही म्हणू शकत नाही… आणि ते कोण आहेत हि माहिती काढायला वेळही नसतो… संजू परब
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी
निवडणूक काळात प्रचार करताना अनेक लोकं भेटतात… पुष्पगुच्छ देतात… तेव्हा तेवढा वेळ नसतो समोरचा माणूस कोण आहे हे चौकशी करण्यात… गृप मध्ये येतात आणि वैयक्तिक फोटो काढतात… त्यावेळी समोरचा माणूस हा मतदार आहे हेच आमच्या डोक्यात असतें… त्यामुळे कुणालाही दुखवायचे नाही हा आमचाच नाही तर सगळ्याच राजकीय नेत्यांचा नियम आहे… त्या मुळे फिरोज बाबा चा गुच्छ मि स्विकारला … यात माझ़ काय चुकलं? असा सवाल संजू परब यांनी करीत वैभव नाईक दारूच्या नशेत आरोप करीत आहेत असा टोला देखील लगावला
वैभव नाईक यांनी संजू परब आणि फिरोज बाबा यांचा एक फोटो व्हायरल करीत त्यांचा आणि संजू परब यांचा काहीतरी राजकीय संबंध असल्याचा आरोप करीत नोटीस आल्याचे सांगितले होते….त्यावर संजू परब यांनी मिश्लिकपणे ते दारू पितात हे माहीत होते बोलतात ते आज समजलं असा टोला लगावला… निवडणूक काळात अनेक जण भेटायला येतात… त्यावेळी वेळ अजिबात नसतो…कि हा कोण आहे तो कोण आहे हे विचारण्याची… कुठलाही राजकीय नेत्यांकडे ही… तसचं माझं झालं… मला निवडणूक जिंकायची होती… एकच ध्येय जे आपल्याला भेटायला येतात त्यांना नाराज न करणे… ते मी केलें… आता तो बाबा कि अन्य कोणी आहे हे मी थोडेच पाहिले… असं संजू परब यांनी सांगितले


