न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी विठ्ठल मंदिरात ‘विठ्ठल रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’ सुरू 

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

     सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही १६ जुलैपासून २३ जुलै पर्यंत ‘विठ्ठल रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’ मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आला. आज गुरुवार पासून त्याचा प्रारंभ झाला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात विविध भजनी मंडळे, कीर्तनकार आणि संगीतप्रेमी सहभागी झालेत.

सप्ताहादरम्यान दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत महिला मंडळांचे भजन, तर सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वारकरी भजन, कीर्तन आणि संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सावंतवाडीसह बांदा, वेंगुर्ले परिसरातील विविध भजनी मंडळे आणि कलाकार आपली सेवा सादर करणार आहेत. शनिवार दि. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पहाटे काकड आरती, श्रींची महापूजा तसेच सायंकाळी हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. २३ जुलै रोजी सप्ताहाची सांगता महाप्रसादाने होणार आहे. या संपूर्ण सप्ताहात भक्तांनी उपस्थित राहून श्री विठ्ठल-रखुमाईंचे दर्शन घेऊन हरिनामाचा आनंद

घ्यावा, असे आवाहन विठ्ठल मंदिर स्थानिक देवस्थान समिती व विठ्ठल मंदिर उत्सव समिती यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे