न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर संजू परब; नुकसानीची केली पाहणी

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

     सावंतवाडी तालुक्यात सध्या निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळवून देण्यासाठी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर आणि कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आवश्यक पाठपुरावा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन संजू परब यांनी यावेळी दिले.

यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, गटनेते शरद धाऊसकर,पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, उत्कर्षा गावकर, प्रणाली टिळवे, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते. दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी संजू परब यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे