न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी रेल्वे स्टेशन समोर अपघातात युवक जखमी

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

सावंतवाडी रेल्वे स्टेशनसमोर दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या अपघातात ओंकार आनंद कारिवडेकर (२२ रा. मळेवाड) हा  जखमी झाला. तर त्याच्या सहकाऱ्यालाही दुखापत झाली आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

पल्सर दुचाकीस्वार मळेवाडच्या दिशेने जात होता. तर अल्टो कार मळेवाड येथून सावंतवाडीच्या दिशेने येत होती. रेल्वे स्टेशन समोर दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. यात ओंकार कारिवडेकर दुचाकीवरून उडून कारच्या मागील भागात रस्त्यावर कोसळला. या दरम्यान सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या १०२ रुग्णवाहिकेने दोन्ही जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे