जि.प. पूर्ण प्राथ. केंद्रशाळा इन्सुली नं. ४ चे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश
सिंधुदुर्ग / राजू तावडे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा इन्सुली नंबर ४ च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत यशाची परंपरा कायम राखली आहे. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ७ वी) शाळेने १०० टक्के निकाल नोंदवला असून परीक्षेला बसलेले दोन्ही विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
कु. चिन्मयी निलेश मेस्त्री (इ. ७ वी): सेट ‘जे’ मधून परीक्षा देत तिने जिल्हा ग्रामीण शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत ६३ वा तर तालुका स्तरावर १३ वा क्रमांक मिळविला आहे.
कु. कृष्णा संदेश पालव (इ. ७ वी): सेट ‘ए’ मधून परीक्षा देत त्याने जिल्हा ग्रामीण शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत ६ वा आणि तालुका स्तरावरही ६ वा क्रमांक मिळवून विशेष नैपुण्य प्राप्त केले आहे.
कु. संपदा संदेश पालव (इ. ४ थी): पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये (इयत्ता चौथी) यश संपादन करत ती उत्तीर्ण झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशामागे सातवीचे वर्गशिक्षक तथा मुख्याध्यापक श्री. रुपेश दत्ताराम परब व शाळेतील सर्व सहकारी शिक्षक श्रीम. प्रिया करमळकर, श्रीम. भक्ती मुळीक, श्रीम. प्रतिभा खूरसुले तसेच केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. लक्ष्मीदास ठाकूर यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन आणि कष्ट लाभले.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक तसेच शिक्षण विभागाकडून सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.


