न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नळपाणी पाईपलाइन टाकण्याचे काम निकृष्ट….. प्रशासनाला घेराव घालण्याचा सुभेदार यांचा इशारा

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडी शहरातील न्यू खासकीलवाडा ते जेल नजीकच्या सर्व परिसरात नगरपालिकेकडून सुरू असलेले नळपाणी पाईपलाइन टाकण्याचे काम निकृष्ट पद्धतीने तसेच अगदी धीम्या गतीने सुरू आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सर्व प्रभागात खोदाई करून ठेवण्यात आल्याने रात्रीच्या वेळी अपघातासारखे प्रसंग उद्भवू शकतात. त्यामुळे तातडीने हे काम पूर्ण करावे अन्यथा प्रशासनाला घेराव घालत जाब विचारला जाईल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांनी दिला आहे.
सावंतवाडी शहरात सगळीकडे रस्ते खोदाई करून नवीन नळपाणी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या खोदाईंमुळे शहरात ठिकठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले आहे. खसकिलवाडा, न्यू खासकिलवाडा जेल नजीकचा संपूर्ण भाग धुळीने माखला आहे. या भागात सध्या जोरात खोदाईचे काम सुरू असून यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून सुरू असलेले पाइपलाइन टाकण्याचे काम अगदी धीम्या गतीने सुरू आहे. यामुळे परिसरात धुळ पसरली असून ज्येष्ट नागरिकांना श्वसनाचे त्रास उद्भवू लागले आहेत. अधिकारी, अभियंता यांनी हे काम सुरू असताना प्रत्यक्ष साईटवर असणे गरजेचे असताना कोणीही अधिकारी या ठिकाणी फिरकत नाही. रस्ते खोदाई साठी खासकिलवाडा परिसरातील रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. एक भाग खोदाई करिता घ्यावा तेवढाच पट्टा वाहतुकीस बंद ठेवला जावा अशी सूचना सुभेदार यांनी केली आहे. हे काम पूर्ण करून डांबरीकरण केले जावे, धुळीच्या त्रासातून नागरिकांना मुक्त करावे अन्यथा प्रशासनाला उबाठा सेनेच्या वतीने घेराव घालण्यात येईल असा इशारा तालुकाप्रमुख सुभेदार यांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे