न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सांगलीत नर्सरीला आग लागून महिलेचा संशयास्पद मृत्यू

सांगली/

 सांगली शहरातील धामणी चौक येथे असणाऱ्या मयूर नर्सरीला भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. निकिता शिव मनगुळे-लोंढे असे आगीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या भीषण आगीत नर्सरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस कसून तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, निकिता मनगुळे-लोंढे व तिचा पती कर्नाटकातील कागवाड येथील असून ते सध्या सांगली शहरातील धामणी चौकातील मयूर नर्सरीमध्ये राहण्यास होते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास नर्सरीमध्ये असणाऱ्या पत्राच्या शेडला व नर्सरी मधील झाडांना आग लागली. आगीची माहिती समजताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
अग्निशमन घटनस्थळी पोहचेपर्यंत महिला ज्या पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती त्या ठिकाणी ती होरपळली. शिवाय त्या पत्र्याच्या शेडला बाहेरून कडी असल्याचे निदर्शनास आले. तसेच आगीच्या घटनेनंतर तिच्या पतीने घटनास्थळावरून पलायन केल्याचे स्थानिकांनी सांगितले.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे