न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईची मागणी

 

​सिंधुदुर्ग / राजू तावडे

सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यापूर्वी नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घेतला होता, मात्र तरीही हा त्रास कमी झालेला नाही. आता न्यायालयाने पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट थांबविण्यासाठी आवश्यकतेनुसार दयामरण देण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील नागरिक, पादचारी आणि लहान मुलांना त्रास देणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषदेने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जनतेकडून होत आहे.
​सावंतवाडी नगरपरिषदेने शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्याची योजना तयार केली होती. मात्र, या योजनेची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, शहरातील विविध भागांत कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी, लहान मुले आणि वाहनधारकांना हे कुत्रे अंगावर धावून जात असून, चावा घेण्याच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे.
​शहरातील सर्वच प्रभागांमध्ये रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आणि आपसातील भांडणांचा कर्कश आवाज येतो. यामुळे शहरातील वयोवृद्ध, मधुमेही आणि रक्तदाब (ब्लडप्रेशर) असलेल्या रुग्णांची झोपमोड होत असून त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे सावंतवाडी नगरपरिषदेने गांभीर्याने लक्ष देऊन, न्यायालयाच्या आदेशानुसार पिसाळलेल्या व उपद्रवी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने मोहीम हाती घ्यावी, अशी आग्रही मागणी सावंतवाडी शहरवाशीयांकडून होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे