इराण युद्ध … मर्चंट जहाजावरील सावंतवाडीच्या रोहन धुरी ची मदतीची याचना
सिंधुदुर्ग/
इराण विरोधात इजरायल आणि अमेरिकेने पुकारलेल्या युद्धात समुद्रात अनेक वाणिज्य जहाजांजवळ बॉम्ब पडत असून.. अनेक ठिकाणी भारतीय मर्चंट नेव्ही ची जहाज अडकली आहेत. इराण जवळ मनाली नावाच्या जहाजावरील कर्मचाऱ्यांनी भारतीय सरकारला वाचवण्यासाठी मदतीची याचना केली आहे… यात सावंतवाडी शहरातील रोहन धुरी हा अडकला असून त्याने व्हिडिओ पाठवत मदतीची याचना केली आहे. रोहन खासकीलवाडा भागात राहत आहे.


