कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन… धर्मेंद्र प्रधान यांचे खाते बदलणार…पण राजीनामा नाही
संतोष मुळीक
गेल्या चार वर्षांत केंद्रीय परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावरून रणकंदन माजले असताना या विषयी प्रश्न उपस्थित करणा-या युवकांना सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी कॉक्रोच हि उपाधी दिल्याने संतापलेल्या आणि युवा नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्रातील दिपके याने देशात नव्या जनरेशनच्या कॉक्रोच जनता पार्टीची सोशल मीडिया स्थापना केली आणि केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेता खाते बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
दिपके याने काढलेल्या पार्टीला सोशल मीडियावर वाढते फॉलोअर्स पाहता घाबरलेल्या भाजपाने त्यांची सर्व सोशल मीडिया अकाऊंट बंद केली. यामुळे युवा वर्ग अधिक आक्रमक झाला. त्यांनी आज जंतरमंतर वर धर्मेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सरकारने त्यावर अद्याप काही हालचाल केली नाही.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जगात सात देशात युवा क्रांतीचा आगडोंब उसळून सत्ता पालट झाला. लगतच्या नेपाळमध्ये तर मंत्र्यांना कपडे काढून मारले. अशी स्थिती आपल्या विरोधात होऊ नये म्हणून शिक्षण मंत्री धर्मेंद्र यांना शिक्षण मंत्रीपदावरून काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत पण यात कॉक्रोच जनता पार्टीचे पुर्णपणे यश वाटू नये म्हणून त्यांना दुसऱ्या खात्याचे मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे समजते. येत्या चार पाच दिवसात तसा निर्णय घेतला जाईल. अन्यथा विरोधकांना संपविण्याचा नादात नवा पक्ष आपलं अस्तित्वच संपवेल अशी भिंती सरकारला आहे. आणि बळाचा वापर केल्यास युवा वर्ग सोडाच इतर जनता, विरोधकर एकत्रित येऊन आपला ‘गेम’ करतील हि भिंती देखील असल्याने धर्मेंद्र प्रधान यांचे खाते पालट होणार हे निश्चित…


