निलंबित ट्रॅफिक वॉर्डनला वाकडमध्ये चेंन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात अटक
पुणे/ गौरी देसाई
पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना लक्ष करून त्यांची सोन साखळी हिसकावणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पकडलेला आरोपी हा निलंबित ‘ट्रॅफिक वार्डन’ आहे. वाहतूक विभागातूनच चोरलेल्या गाडीचा वापर तो चोरी करण्यात साठी करत होता. सचिन चव्हाण असं सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोरट्याच नाव आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सचिन चव्हाण या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.


