नाशिक : तिथे दुष्ट शक्ती, 40 दिवस जाऊ नका; मांत्रिक महिलेने 21 वर्षीय तरुणीशी स्वतःच्या मुलाचा साखरपुडा लावला
नाशिक/ वृत्तसंस्था
अघोरी पूजा, उतारे आणि जादूटोण्याची भीती दाखवत धुळे येथील महिलेकडून सुमारे १ लाख ६० हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याशिवाय पीडित महिलेच्या २१ वर्षीय मुलीला कुटुंबापासून दूर ठेवून तिचा जबरदस्तीने महिला मांत्रिक सरिता जाधव हिच्या मुलाशी साखरपुडा केल्याचा आरोपही करण्यात आला आहे


