लखमसावंत भोंसले यांची संजय घोडावत युनिव्हर्सिटीच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पदी निवड.
सिंधुदुर्ग / राजू तावडे
मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य लखमसावंत भोंसले यांची संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूरच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पदी निवड झाली. गेली अनेक वर्ष त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी ते कार्यरत आहेत.त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुने व युजी ते पिजी पर्यंतचे विविध अभ्यासक्रम राबवणारे मुंबई विद्यापीठाचे बेस्ट कॉलेज तसेच नॅक ‘ए ‘ श्रेणी प्राप्त असलेले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले स्वायत्त महाविद्यालय, त्याचबरोबर लीड कॉलेज दर्जा प्राप्त केलेले श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या संस्थेमध्ये ते कार्यरत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, त्याप्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. शुभदादेवी भोंसले, संस्थेचे कार्यकारीणी सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत, संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, श्री पंचम खेमराज लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अश्विनी लेले, मदर क्वीन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगावकर, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे सदस्य उपस्थित होते.


