ज्ञानेश नाईक याला पुढील शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकी कडून २० हजार रुपये
सिंदुदूर्ग/ राजू तावडे
ज्ञानेश गणेश नाईक हा नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी लोकमान्य होमिओपॅथी एसएमसी महाविद्यालय चिंचवड पुणे येथे शिक्षणासाठी जात आहे. हा मुलगा अतिशय हुशार असून होतकरू आहे. त्याला शिक्षणाची खूप आवड आहे. त्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज होती. याबाबत त्याने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे व शरदिनी बागवे यांच्याशी संपर्क साधला.
संस्थेच्या सदस्या शरदिनी बागवे यांनी ज्ञानेश नाईक याला वैयक्तिक १० हजार रुपयांची मदत केली. तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कडून १० हजार रुपये मिळवून एकूण २० हजार रुपयांचा धनादेश देऊन त्याला शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आणि पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, हेलन निबरे, समीता बागवे, शरदिनी बागवे, रवी जाधव, प्रतिभा दवळी उपस्थित होत्या.


