जमीन मोजणीदरम्यान अभियंत्यावर लाकडी पट्टीने हल्ला
रायगड/
अलिबाग तालुक्यातील मौजे चौल येथे सुरू असलेल्या रेवदंडा–साळाव सार्वजनिक जमीन मोजणीच्या कामादरम्यान सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करून शासकीय कामात अडथळा आणल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


