न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

राजेसाहेब हे विद्वान व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व:… कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

    श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांचे चरित्र अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या चरित्राचे वाचन प्रत्येक विद्यार्थ्याने केले पाहिजे. त्यातून

एक तरी विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे, असे आवाहन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना केले.

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे हिज हायनेस लेफ्ट.कर्नल श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांची ९९ वी जयंती ,’संस्थापक दिन’ म्हणून गुरुवारी साजरी करण्यात आली. श्रीमंत

शिवरामराजेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. नवीन बांधलेला इमारतीला लेफ्ट. कर्नल हिज हायनेस श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांचे नाव देऊन फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले,

प्रमुख अतिथी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, संस्थेच्या चेअरमन सौ.शुभदादेवी भोंसले, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठाचे अधीसभा सदस्य लखमराजे भोंसले, संस्थेच्या विश्वस्त व सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, संस्थेचे कार्यकारीणी सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, श्री. वसंत केसरकर, मालवणी कवी दादा मडकईकर, श्री. नकुल पार्सेकर , माजी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. दयानंद गवस, श्री. सुमन गावडे, प्रा.सुभाष गोवेकर, प्रा. अन्वर खान,लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अश्विनी लेले, मदर क्वीन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगावकर, श्री. सुभाष देसाई, श्री. प्रेमानंद कुडदेसाई, श्री.

ए.के. देसाई, पी पी देसाई, श्री. काका मांजरेकर, प्रा.जी.एम शिरोडकर शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले, राजेसाहेब हे विद्वान व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. ७० वर्षांपूर्वी कोकणासारख्या दुर्गम भागामध्ये शिक्षण व्यवस्था सुरू करून त्यांनी उच्च शिक्षणाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले केले. हस्तकला व लोककलेला राजाश्रय देणारे खरे राजे होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांची कौशल्य विकसित करणे हा बदललेल्या शिक्षण पद्धतीचा मुख्य उद्देश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करायला हवा परंतु एआय चे गुलाम होऊ नका असा सल्ला डॉ. कुलकर्णी यांनी दिला.

त्यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले म्हणाले, १९६० च्या दरम्यान हे कॉलेज राजे साहेबांनी सुरू केले. त्या काळामध्ये दळणवळणाची साधने अपुरी असल्यामुळे राजवाड्यामध्येच विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुरू केले. त्यामुळे गरीब मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. त्यामुळे या भागातील मुले शिकली.आजही संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत करून स्वयंशिस्तीने ज्ञान मिळवावे व यशस्वी व्हावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

याप्रसंगी श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांचे २०२७ या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने बोधचिन्हाचे अनावरण प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले. त्यांनी महाविद्यालयामधील विविध अभ्यासक्रम व विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ पुनम सावंत यांनी केले तर आभार प्रा. डॉ. बी. एन हिरामणी यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे