न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीतील सुप्रसिद्ध दशावतार युवा कलावंत गौरव शिर्के यांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी कडून डॉक्टरेट पदवी

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध दशावतार कलावंत तथा जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचा नायक गौरव शिर्के यांना आँक्सफोर्ड विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी आँफ युके यांच्या माध्यमातून दशावतार कलेतील डॉक्टरेट या पदवीने सन्मानीत करण्यात आले. त्यामुळे नावाप्रमाणेच दशावतार कलेचा गौरव असलेल्या गौरव शिर्के यांच्या कलेत या पदवीने मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दशावतार कलेत गौरव शिर्के हे एक मोठ नाव असून वयाच्या पाचव्या वर्षापासुन ते दशावतार कलेत कार्यरत आहेत गेली २५ वर्षे दशावतार कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय असे एकुण ९२ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे त्यांनी दशावतार कलेसाठी अनेक कथानकांचे लेखन केले आहे.

तसेच वल्ड एक्सलेंट बुक आँफ रेकाँर्ड भारत, अमेरीका, इंग्लंड, जपान, दुबई, स्पेन या सहा देशांमधून भारताचे प्रतिनिधित्व करत जागतिक स्तरावर सन्मान मिळवला आहे. सध्या ते गरूड गर्व हरण नाट्यप्रयोगात श्रीकृष्णाची भुमीका साकारतात. दशावतार कलेतील त्यांच्या या उत्कृष्ट योगदानाबद्दल दशावतारमध्ये पहील्यांदाच आँक्सफोर्ड विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी युके यांच्या माध्यमातून दशावतार मध्ये डाँकटरेटची पदवी प्रदान करण्यात आली.

दरम्यान गौरव शिर्के हे गोठण भागात सामाजिक,सांस्कृतिक कार्यातही सहभागी असतात. तसेच ते सीपीएल क्रिकेट संस्थेचे सभासद असून उत्कृष्ट खेळाडू आहेत.

3/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे