सनातन संस्थेतर्फे सिंधुदुर्गात ६ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’
सिंधुदुर्ग / राजू तावडे
भारताचे अद्वितीयत्व असलेल्या गुरु-शिष्य परंपरेचे नाते समाजापर्यंत पोचवावे, यासाठी सनातन संस्था यंदाचा ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ हा ‘रामराज्याच्या निर्मितीची दिशा
स्पष्ट करणारा उत्सव म्हणून साजरा करत आहे. हा उत्सव बुधवार दिनांक २९ जुलै रोजी होत आहे. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगु, मल्याळम् आदी विविध भाषांमध्ये देशभरात ८९ ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, देवगड, मालवण आणि वेंगुर्ले अशा सहा ठिकाणी महोत्सव होणार आहेत.
या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प. पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य यावर लघुपट, धर्मरक्षक आणि हिंदुनिष्ठ यांचे सत्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रभक्त अन् धर्मनिष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, रामराज्याच्या स्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप, तसेच ‘रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि दिशा’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. या महोत्सवात ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक
फलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १. श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, जामसंडे, देवगड दु. ३.३० वाजता
२. मातोश्री मंगल कार्यालय, नवरे हॉस्पिटल समोर, कणकवली वेळ दु. ३ वाजता, ३.मराठा समाज भवन सभागृह, कुडाळ हायस्कूल जवळ, कुडाळ दु. ३.३० वाजता,
४. दैवज्ञ भवन, मालवण सायं. ४ वाजता
५. साई दरबार सभागृह, वेंगुर्ला दु. ३.३० वाजता, ६. बॅ. नाथ पै सभागृह, नगरपरिषद, सावंतवाडी दु. ३.३० वाजता साजरी होणार आहे.


