न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जागतीक कांदळवन दिनी वेंगुर्ला मानसीश्वर देवस्थान नजीक स्वच्छता अभियान

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

   “जागतिक कांदळवन संवर्धन दिन” चे औचित्य साधून वेंगुर्ले उभादांडा येथील मानसीश्वर देवस्थान नजीकच्या कांदळवन क्षेत्रात श्री पंचम खेमराज महाविद्यालय व कांदळवन विभाग यांचा संयुक्त विद्यमाने स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला.

मांडवी खाडी वेंगुर्ला येथे विद्यार्थ्यांसोबत कांदळवन ट्रेल आयोजित करण्यात आली. याठिकाणी परिमंडळ वनाधिकारी श्री. सुनील सावंत यांनी जागतिक कांदळवन संवर्धन दिनाच्या अनुषंगाने खाडी क्षेत्रात आढळणारे कांदळवनाचे पर्यावरणातील महत्त्व, कांदळवनाचे महत्त्व, कांदळवनाला असणारे धोके आणि नियम याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले व कांदळवनाचे संवर्धन व संरक्षणाचे आवाहन केले. तसेच कांदळवन ट्रेलच्या माध्यमातून स्वामिनी महिला बचत गटातील सदस्यांनी कांदळवन व पक्षी प्रजाती, तसेच त्यांचे आयुर्वेदिक उपयोग याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडीचे प्रा.डॉ. गणेश मर्गज, डॉ. शलाका वालावलकर, प्रा. तन्वी नाईक, प्रा. श्वेता जाधव, प्राणीशास्राचे विद्यार्थी, तसेच कांदळवन प्रतिष्ठानचे, वनरक्षक श्री. अजित भोसले, वनमजूर गौरेश खडपवर, कांदळवन प्रतिष्ठान व यु. एन. डी. पी. (जी. सी. एफ) प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक दिगंबर तोरस्कर, जागृती गवंडे, सौरभ राऊळ, शुभम कांबळे, युगंधरा कांबळे, सुकृती नाईक आदी उपस्थित होते.

कांदळवन यांचा विस्तार उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशापुरता मर्यादित असून जगभरात 118 देशांमध्ये 1,37,766 चौरस किलोमीटर क्षेत्रात ती आढळतात. अशी माहिती परिमंडल वनाधिकारी श्री. सुनील सावंत यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाळांची बेटे व कांदळवणे संवर्धित करणे ही आजच्या काळाची गरज आहे. प्रवाळे व कांदळवने ही माशांची पैदास केंद्रे आहेत. त्याला जपायला हवे तरच सिंधुदुर्ग जिल्ह्याची मत्स्यसंपदा अभाधित राहील अन्यथा मत्स्य दुष्काळ निर्माण होईल व कांदळवने नसल्यास अनेक नैसर्गिक आपत्ती फार मोठ्या प्रमाणात विघातक ठरू शकतात हे या कार्यक्रमामुळे अधोरेखित करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे