वेंगुर्ल्यात मंगळवेढा येथील शिक्षकाची आत्महत्या
सिंधुदुर्ग/
वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे पालकरवाडी येथे एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग बिरप्पा नगरे (वय ५०) हे मूळचे मंगळवेढा येथील रहिवासी होते. ते गेल्या १५ वर्षांपासून वेतोरे हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते.
प्रेमळ स्वभाव, विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वामुळे ते विद्यार्थी, सहकारी शिक्षक तसेच पालकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या अकाली निधनाने शैक्षणिक क्षेत्रासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित घटनेचा पुढील तपास सुरू आहे


