जिजाऊंच्या सिंदखेडराजातील क्रिडा संकुलाची दुरावस्था
बुलढाणा/ प्रतिनिधी
जिल्ह्यातील जिजाऊ़़चे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथील तालुका क्रीडा संकुलाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. खेळाडू घडविण्यासाठी उभारलेले क्रीडा संकुल आज दारूच्या अड्ड्यात रूपांतरित झाल्याचे चित्र असून, परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. इमारत कायम कुलूपबंद असून क्रीडा साहित्य आणि मूलभूत सुविधांचा अभाव आहे. लाखो रुपये देखभाल खर्च होत असताना क्रीडा संकुलाची ही अवस्था कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. राज्याचे क्रीडा मंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी तातडीने पाहणी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे…


