न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सहकाररत्न पी.एफ. डॉन्टस यांचा तृतीय स्मृतिदिनास सैनिक पतसंस्थेकडून अभिवादन 

 

 सिंधुदुर्ग / राजू तावडे

     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात सहकार चळवळीला दिशा देणारे दूरगामी नेतृत्व, संघटन कौशल्य आणि जिल्ह्याच्या सहकारात सैनिकांना महत्त्वाचे स्थान मिळवून देणारे सहकाररत्न विभूषित कै. पी.एफ. डॉन्टस यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन श्री. बाबुराव कविटकर व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील राऊळ यांनी डॉन्टस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आठवणींना उजाळा दिला. सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले मोलाचे कार्य, सहकाराची तत्त्वे आणि सहकार वाढवण्यास घेतलेली मेहनत सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न सदैव स्मरणात राहतील. त्यांनी स्थापन केलेल्या सहकार-क्षेत्रातील सर्व संस्था आज उत्तरोत्तर प्रगती करत भरीव कामगिरी करताना दिसत आहेत. त्यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन, सहकारातील प्रामाणिकपणा, पारदर्शकता व विकास दूरदृष्टी यांचा वारसा सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आणि सहकारी संस्थांना भविष्यकाळातही मार्गदर्शक ठरणार आहे.

याप्रसंगी संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रल्हाद तावडे, प्रशासन विभाग प्रमुख श्री. विठ्ठल बिडये, मुख्य कर्ज व्यवस्थापक सौ. वैदेही गावडे, मुख्य अंतर्गत हिशोब तपासणीस सौ. साधना बागवे, प्रशासन व्यवस्थापक श्री. श्याम कलंबिस्तकर, सहा. कर्ज व्यवस्थापक सौ. पुजा पांचाळ, सी.बी.एस. प्रमुख सौ. संगिता पाटकर, सहा. शाखा व्यवस्थापक श्री. विजय खडकपर, वसुली अधिकारी श्री. लक्ष्मण गावडे, लिपिक वंदना राऊळ, महेंद्र गवळी, पंकज लाड, गौरव गोसावी, श्रेया कांडरकर, साक्षी पोईपकर, आरती घाडी, अश्विनी म्हाडगुत, सविता नार्वेकर, प्रिती नार्वेकर, विनंती परब, गुरुनाथ सावंत, कृष्णा परब, विक्रम परब इत्यादी व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे