सावंतवाडीतील श्री दत्तगुरू महिला गृप तर्फे जागतिक महिला दिन साजरा
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सावंतवाडीतील खासकिलवाडा येथील श्री दत्तगुरू महिला गृप तर्फे जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांंनी साजरा करण्यात आला.
८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा होतो. त्या अनुषंगाने श्री दत्तगुरू महिला गृप च्या क्षमा विचारे, सुचिता गावडे, राजश्री निर्गुण, यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी मुलांनाही या स्पर्धेत सहभागी होऊ देत आकर्षक पारितोषिके देण्यात आली होती. श्री दत्तगुरू महिला गृप हा दरवर्षी सातत्याने महिला दिन असो म्हणा की अन्य धार्मिक,, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम असो सतत अग्रभागी असतो.


