सभापती सुश्मिता जाधव यांचे अशोक दळवींकडून अभिनंदन
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती पदी सुश्मिता जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी गजानन नाटेकर, राजन रेडकर, शंकर नाईक, गुंडु जाधव, विश्वास घाग, एकनाथ हळदणकर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


