न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त १४ मे रोजी चौकुळ येथे विविध कार्यक्रम

सिंधुदुर्ग / राजू तावडे

बौद्ध विकास मंडळ, चौकुळ यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त गुरुवार, दि. १४ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम धर्म स्मृती बुद्ध विहार, आदर्श समता नगर, चौकुळ येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता पंचशील ध्वजारोहणाने होणार असून, त्यानंतर प्रतिमा पूजन व बुद्धवंदना आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी ॲड. अनिल निरवडेकर (उपनगराध्यक्ष, सावंतवाडी), प्रा. रुपेश पाटील (मुख्य संपादक, सत्यार्थ महाराष्ट्र), गुलाबराव गावडे (सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत चौकुळ), सौ. शोभा गुलाबराव गावडे (जि.प. सदस्या), मायकेल डिसोझा (पंचायत समिती सदस्य) आदि उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १ वाजता स्नेहभोजन, दुपारी ३ वाजता महिला मेळावा, तर सायंकाळी ५ वाजता मुला-मुलींसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरणाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बौद्ध विकास मंडळ, चौकुळ तसेच माता रमाई महिला मंडळ, चौकुळ आणि सावित्रीबाई महिला मंडळ, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे