पुण्यात मद्यधुंद कार चालकाने चक्क पोलीसालाच गाडीत कोंबून पळविण्याचा प्रयत्न
पुणे/ वृत्तसंस्था
पुण्एयात एका मद्यधुंद वाहनचालकाने हद्दच केली. चार ते पाच गाड्या उडवल्या खऱ्या पण पोलिसांनी अडवून बोलायला गेले तर पोलिसांनाच गाडीत ओढून गाडी पळवली. हा धक्कादायक आणि पोलिसांच्या नागरिकांच्या डोक्याला ताप ठरणारा प्रकार घडला पुण्यातील वारजे परिसरात. एकदम फिल्मी आणि धक्कादायक प्रकार घडल्याने तेथील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.


