सिंधुदुर्गातील आचिर्णे गावात गोळीबारात एकाचा मृत्यू तर एक जखमी
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
शिकारीसाठी करण्यात आलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची घटना वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे गावात मध्यरात्री घडली असून यात अजून एकजण खांद्याला गोळी लागून जखमी झाला आहे….
समजलेल्या माहिती नुसार काही जण बेकायदेशीर शिकार करण्यासाठी जंगलात गेले होते. त्यावेळी शिकार समजून गोळी झाडली गेली ती एकाला लागून तो जागीच गतप्राण झाला तर त्याच्या बरोबर असलेल्याच्या खांद्याला चाटून गेल्याने तो जखमी झाला आहे.
दरम्यान पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून हा अपघात कि घातपात या बद्दल माहिती घेत आहेत.


