न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

यंदा पाऊस दडी मारणार…. कमी पावसाचा अंदाज

पुणे/ वृत्तसंस्था

गेल्या वर्षी शेतकऱ्यांना झोडपणारा आणि राज्यात हाहाकार माजवणारा मान्सून यंदा मात्र दडी मारण्याची शक्यता आहे…आणि त्याला कारण ठरलंय एल निनो सक्रीय होण्याची शक्यता. त्यामुळेच जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय… त्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलंय.

जून महिन्यात चांगल्या पावसाला सुरुवात होईल… मात्र जुलै महिन्यात पाऊसाची अनिश्चितता असल्यानं पाऊस ओढ देण्याची शक्यता आहे. तर ऑगस्टमध्ये पावसात मोठी घट होऊ शकते… त्याबरोबरच सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊसाचा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय…
खरं तर स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज 40 टक्के आहे.. तर 30 टक्के दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असंही स्कायमेटनं म्हटलंय… त्यामुळे ही आकडेवारीच दुष्काळाचं सावट गडद होत असल्याचं स्पष्ट करतेय.

हवामान बदलामुळे अल निनो आणि एल निनोचा परिणाम जाणवतोय… त्यामुळे देशात कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ पडतो.. यंदाही दुष्काळ पडण्याची शक्यता असल्यानं राज्य सरकारने जिल्हानिहाय दुष्काळ व्यवस्थापन समिती स्थापन केलीय… ही समिती दुष्काळावर मात करण्यासाठी आणि चारा टंचाईवर उपाययोजना सुचवणार आहे… त्यामुळे सरकारनं दुष्काळाच्या विरोधात तयारी सुरु केली असली तरी राज्यातील शेतकऱ्यांनीही शेतीच्या मशागतीवेळी आणि पेरणीबाबत हवामान खात्याच्या सुचनांनुसारच पावलं टाकण्याची गरज आहे… त्यामुळे होणारं नुकसान टाळणं शक्य होईल”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे