समाजकल्याण शासकीय विश्रामगृहात ६० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
नंदुरबार/ वृत्तसंस्था
नंदुरबारमधून मोठी बातमी समोर येत आहे. शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या 50 ते 60 विद्यार्थ्यांना जेवणानंतर विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. रात्रीचे जेवण केल्यानंतर अचानक विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्याने तातडीने त्यांना शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत गंभीर असणाऱ्या रुग्णांना नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. या घटनेनंतर शहादा येथील शासकीय रुग्णालयाबाहेर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली.
शहादा येथे समाज कल्याण विभागाचे शासकीय वसतिगृहा आहे. दररोज प्रमाणे शनिवारी रात्री सात ते साडेसात वाजे दरम्यान वसतिगृहातील 217 विद्यार्थी जेवण करण्यासाठी बसले. सर्व मुलांना जेवणासाठी शेवग्याची भाजी, भात, पोळ्या दिल्या होत्या. जेवण करतानाच विद्यार्थ्यांना त्रास जाणू लागला. अचानक विद्यार्थ्यांना उलट्या झाल्याने विश्रामगृहात एकच खळबळ उडाली. 50 ते 60 विद्यार्थ्यांची तब्येत खालवल्याने त्यांना शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शहजादा येथील शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना विषबाधा झाली यात देविदास बाशिंगे'(रा. ओसर्ली) पार्थ धीवरे, आदित्य सूर्यवंशी, पंकज सिताराम कुवर, पारदिप (पूर्ण नाव माहिती नाही), मनोहर पानपाटील या सहा विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी शहरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे


