‘तो” आलाय.. आनंद वार्ता देणार
मुंबई/
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मुंबई-ठाण्यात तापमान वाढू लागलं होतं. पण १५ जुलै रोजी मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह काही भागांमध्ये पावसाचं पुनार्गमन झालं. वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. मुसळधार पाऊस झाला नसला तरी वातावरणात गारवा पसरला आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ जुलै ते २१ जुलैदरम्यान कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. परंतु, मुसळधार पावसासाठी महाराष्ट्राताला २० तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे


