न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नागपूर स्फोट दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू

नागपूर/

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर औद्योगिक वसाहतीत असलेल्या सोलर इंडस्ट्रीज (SBL) या स्फोटक तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ५ कामगारांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट भीषण असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या एसबीएल कंपनीत पहाटेच्या सुमारास हा स्फोट झाला. यावेळी या कारखान्यातील काम सुरू होते. त्याचवेळी अचानक हा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. तसेच या कारखान्याची मुख्य इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. यावेळी स्फोटामुळे कारखान्याचे अवशेष अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत उडाले. तसेच स्फोटानंतर इमारतीचा ढिगारा पडल्याने त्या ढिगाऱ्याखाली आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे