जे. बी.कन्ट्रक्शन कार्यालयाचे कुडाळ येथे उद्घाटन
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता श्री. रमेश जोशी यांनी बांधकाम व्यवसायात पदार्पण केले आहे. कुडाळ येथील आशीर्वाद एवेन्यू या इमारतीमध्ये जे. बी.
कन्ट्रक्शन या त्यांच्या कार्यालयाचे शुक्रवारी सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग, आंबडपाल कुडाळ या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता श्री. गोविंद श्रीमंगले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जे.बी. कंट्रक्शनचे पार्टनर चंद्रकांत बिले, श्री. महेंद्र डांबरेकर उपविभागीय अधिकारी, विद्याधर सुतार गटविकास अधिकारी वेंगुर्ला, शैलेश परब, विजय वाठोरे, सौ. मीनल जोशी, भाऊ बाक्रे, मुंडये, विश्वनाथ राऊळ, एकनाथ राऊत, रामचंद्र राऊळ, रवींद्र जोशी, मयुरी जोशी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


