न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

रत्नागिरी शहरात एका प्रमुख पक्षाच्या राजकीय पुढा-यास महिलांकडून घरात घुसून चोप

रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी तालुक्यातील एका प्रमुख पक्षाच्या शहरातील एका प्रमुख पदाधिकाऱ्याच्या दीर्घकाळ चाललेल्या लंपट वर्तनामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व संताप निर्माण झाला आहे. रत्नागिरी शहरातील चवंडेवठार व घूडेवठार येथील नागरीकांनी या शहरातील आंबट प्रमुख पदाधिकाऱ्याच्या घरात जाऊन त्याला चोप दिल्याची घटना घडली आहे. त्याच्या नेहमीच्या आंबटगिरीमुळे हे कृत्य झाले. या प्रकरणात त्या नेत्याच्या मुलीच्या वयाची एक मुलगी बरोबर मुलीच्या आई-वडिलांनी स्वतः त्या नेत्याचे हे कृत्य पाहिल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या लंपट पदाधिकाऱ्याने मुलीला एका ठिकाणी कामावर लावले आणि तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

या व्यक्तीची आंबटगिरीची सवय अनेक वर्षांपासून चालू असल्याचे नागरिक सांगतात. काही वर्षांपूर्वी पक्षाच्या प्रमुख नेत्याच्या हस्तक्षेपामुळे त्याला जेल होण्यापासून वाचवले गेले होते. त्यामुळे रत्नागिरीतील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तरीही हा लंपट पदाधिकारी एका उद्घाटन प्रसंगी पक्षाच्या प्रमुख नेत्याबरोबर दिसल्याने त्याला प्रोत्साहन मिळाल्यासारखे वाटत असल्याने रत्नागिरीकरांमध्ये कमालीची चीड निर्माण झाली आहे.

सर्वात लज्जास्पद बाब म्हणजे रत्नागिरीतील एकाही वृत्तपत्राने ही बातमी छापली नाही. या पदाधिकाऱ्याचे पत्रकारांशी चांगले संबंध असल्यामुळे बातमी दाबली गेल्याची चर्चा नाक्या-नाक्यावर सुरू आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे