न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

श्री एकमुखी दत्त मंदिरात १५ जुलैला श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी

 

सिंधुदुर्ग  / राजू तावडे

सावंतवाडी सबनिसवाडा येथील श्री दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर मध्ये आषाढ शुद्ध प्रतिपदा बुधवार दिनांक १५ जुलै रोजी श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन केले आहे. यावेळी सकाळी ७.०० वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून दुपारी महाप्रसाद आहे, तरी सर्व भक्तगणांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक उपसमितीने केले आहे.
यावेळी सकाळी ८.०० वा. श्री दत्तपूजा, श्री स्वामी पादुकांवर अभिषेक, एकादशनी, ९.०० वा.श्री सत्यदत्त महापूजा, १२.३० वा. आरती, १.०० वा. महाप्रसाद, सायंकाळी ७.०० आरती, ८.०० वाजता भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे