लघुशंकेसाठी थांबलेल्या बसमधील सात प्रवाशांना कंटेनरने चिरडले.. सहा जणांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर
मथुरा/
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे मोठा अपघात झाला आहे. यमुना एक्सप्रेसवेवर एका भरधाव कंटेनरने ७ जणांना चिरडले. या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १ जण गंभीर जखमी आहे. हा अपघात आज सकाळी घडला असून अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीमुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली असून जखमी रुग्णाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्री २:४५ च्या सुमारास प्रवाशांनी भरलेली बस दिल्लीतील नांगलोईहून कानपूरमधील रसूलाबादला जात होती. सुरीर पोलीस स्टेशन परिसरातील माईल स्टोन ८८ जवळ बसमधील प्रवासी बस थांबवून लघुशंकेसाठी उतरले. परंतु ग्रीन झोनमध्ये थांबण्याऐवजी वाटेतच चालकाने बस थांबवली .या दरम्यान लघुशंकेसाठी बसमधून उतरलेल्या प्रवाशांना मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने चिरडले. या भीषण धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुघटनेननंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनस्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रस्ते अपघाताची दखल घेत दुःख व्यक्त केलं आहे. अपघातात मृत झालेल्या प्रवाशांच्या शोकाकुल कुटुंबियांबद्दल त्यांनी तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. मृतांच्या आत्म्यांना शांती मिळावी आणि जखमींना लवकर बरे व्हावे अशी प्रार्थनाही त्यांनी केल


