पैनगंगा नदीला पूर… विदर्भ मराठवाड्यातील गावांत पूर
नागपूर / वृत्तसंस्था
विदर्भ आणि मराठवाडाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे यवतमाळ जिल्ह्यातील दातोडी, कापेश्वर, कवठा आणि चिमटा या चार गावांत पाणी शिरले असून यात घरांसह नागरिकांचं मोठे नुकसान झाले आहे. पैनगंगा, अरुणावती आणि अडाण नद्यांच्या संगमाजवळील चिमटा गावाला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून नागरिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.


