न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी मराठवाडा विदर्भ कोरडा

छ.संभाजीनगर / वृत्तसंस्था

राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मात्र अत्यंत गंभीर चित्र पाहायला मिळतय…. तीव्र दुष्काळ, पाण्याचा प्रचंड तुटवडा आणि प्रशासनाविरोधात असंतोष यामुळे यंदाचा गणेश विसर्जन सोहळा आंदोलनांचे केंद्र बनलाय…”
धाराशिव जिल्ह्यात ऐन गणेश विसर्जनाच्या तोंडावर नदी, नाले, धरण आणि विहिरी कोरड्या ठाक पडल्यायत. गणपतीचं मुख्य विसर्जन केंद्र असलेल्या मांजरा नदीलाही पाणी नाही. यामुळे घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचं विसर्जन कुठं करायचं असा गंभीर प्रश्न गणेश भक्तांसमोर निर्माण झालाय….दुसरीकडे लातूरच्या रेणापूर तालुक्यात तलावात पाणी नसल्यामुळे नागरिकांनी अनोखे आंदोलन केलंय… विसर्जनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने खलंगरी गावातील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाजत-गाजत मिरवणूक काढून बाप्पा थेट रेणापूर तहसील कार्यालयाच्या दारात आणून ठेवला….”
अमरावती शहरातही विसर्जनासाठी तलावात पाणी नसल्याने टँकरच्या साह्याने महानगरपालिकेच्या वतीने तलाव भरणे सुरू आहे…त्यामुळे महापालिकेनं ऐन दुष्काळात टँकरनं विसर्जनासाठी तलाव भरण्यासाठी टँकरच्या पाण्याचा वापर केल्यानं काही जणांनी नाराजी व्यक्त केलीय…दुष्काळामुळे मराठवाडा कोरडा पडलाय. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जनाचं संकट निर्माण झालंय. आधीच बाप्पाला निरोप देण्याची वेळ आल्यामुळे भक्त गहिवरले आहेत. त्यात आता पाणी नसल्यामुळे बाप्पाचं विसर्जन कसं करायचं असा मोठा गंभीर प्रश्न भक्तांपुढे निर्माण झालाय. आता शासकीय पातळशीवर हे विघ्न दूर होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे