नांदेडात बळीराजाची शासनावर राग काढून आत्महत्या
नांदेड / वृत्तसंस्था
नांदेड तालुक्यातील बोरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी शंकर आबानराव क्षीरसागर (वय ४६) यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. पावसाचा दीर्घ खंड, हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान आणि वाढता कर्जाचा भार यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर भावूक व्हिडिओ पोस्ट करत शासन-प्रशासनाच्या धोरणांबाबत संताप व्यक्त केला.”


