न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

विद्यार्थ्यांनी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न बाळगावे:निवृत्त कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा

 

सिंधुदुर्ग  /राजू तावडे 

आपल्या मनोगतात निवृत्त कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा म्हणाले की, देशाला सक्षम तरुणाईची गरज असून विद्यार्थ्यांनी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगावे. सैन्यात आता मुलांसोबत मुलींनाही उत्तम संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन निवृत्त कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा यांनी केले. त्याचप्रमाणे लखमराजे भोसले यांनी माजी सैनिकांच्या जमिनीचा प्रश्न लवकरच सुटेल आणि राजघराणे सदैव सैनिकांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिल्यामुळे तो ही प्रश्न लवकरच सुटेल असे ते म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हयातील समस्त आजी माजी सैनिक यांनी आज रविवारी राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी येथे कारगिल विजय दिनाचे आयोजन केले होते. यावेळी श्री सिन्हा बोलत होते. सैनिक या नात्याने भारतीय सेनेचा गौरवशाली इतिहास, आपल्या सैनिकांनी कारगिल युद्धात गाजवलेले अतुलनीय शौर्य व दिलेले बलिदान सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचावे. राष्ट्रधर्म व राष्ट्र भक्तीची ज्योत प्रज्वलित व्हावी यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा, सिंधूमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर, बटालियन विनोदसिंह, निवृत्त सैनिक संघाचे अध्यक्ष रामचंद्र ताम्हाणकर, डॉ. अमर पोकळे, सुभेदार रामचंद्र सावंत यांसह अनेक माजी सैनिक उपस्थित होते.

या प्रसंगी कारगिल युद्धातील वीर जवान रमेश राऊळ, वीर पत्नी सुप्रिया तेजम, तसेच वीर शुभम सावंत यांचे आई-वडील सौ. अक्षता सावंत आणि विजय सावंत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना लखमराजे भोसले म्हणाले, जीवनात प्रत्येकाने देश व राष्ट्रप्रेम जागृत ठेवून कार्यरत राहिले पाहिजे. सैनिक म्हणून देशसेवा आणि देशाचे संरक्षण केल्यानंतरही माजी सैनिक समाजसेवा करत असल्याने ते खऱ्या अर्थाने सैनिकच आहेत. भावी पिढीत जाज्वल्य देशाभिमान जागृत ठेवण्यासाठी माजी सैनिकांनी पुढाकार घ्यावा,

असे ते म्हणाले.

. डॉ. प्रवीणकुमार ठाकरे आणि राजू मसूरकर यांनी सैनिकांच्या त्यागाचा गौरव करत देशहिताला प्रथम प्राधान्य देण्याचे आवाहन केले. सुभेदार रामचंद्र सावंत यांनी भगवद्गीतेतील धैर्य आणि साहसाचा संदर्भ देत कारगिल विजयाचे महत्त्व विशद केले, तर माजी सैनिक लक्ष्मण गवळी यांनी जम्मू-काश्मीर आणि कारगिल युद्धातील लष्करी मोहिमांचा सविस्तर इतिहास मांडला.

रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रम:

कार्यक्रमापूर्वी सावंतवाडी शहरात भव्य कारगिल विजय दिवस रॅली काढण्यात आली तसेच शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी सैनिकांच्या महिला सदस्यांनी स्फूर्तीगीत सादर केले, तर ध्येय अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धातील प्रसंगांचे नाट्यीकरण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे आभार माजी सैनिक संजय गवस यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे