बीड|
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कापसी फाट्यावर भरधाव टिप्परने कारला धडक दिल्यानंतर कारला आग लागली. या भीषण अपघातात कारमध्ये अडकलेल्या पुष्पा पुरी (४२) आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश पुरी (२५) यांचा जिवंत होरपळून जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मोठ्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले असून घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


