सांगलीत तलावात बुडून आईसह मुलीचा मृत्यू
सांगली/
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरीत ही दुर्दैवी घटना घडली. सत्वला संतोष जाधव आणि मुलगी मंजू संतोष जाधव असं बुडून मृत्यू झालेल्या दुर्दैवी मायलेकींची नावं आहेत. या दोघी दुपारच्या सुमारास कपडे धुण्यासाठी मणेराजुरीजवळील चिमणखोरा पाझर तलावावर गेल्या होत्या.”


