न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नाशिकात उद्या ढगफुटीचा इशारा… पाच तालुक्यातील शाळा, महाविद्यालये बंद

नाशिक/ वृत्तसंस्था

हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात ढगफुटी होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन नाशिक जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. ढगफुटी झालीच तर बचावकार्य करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. तसेच खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाची तयारी काय आहे, याबाबत सविस्तर सांगितले. तसेच नागरिकांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन केले.नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी या 5 तालुक्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच या भागातील आठवडे बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत. तशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांनी उद्या शेतात जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान उद्या बंद ठेवण्यात येणार आहे. सप्तशृंगी परिसरातही अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सप्तशृंगी मंदिरही उद्या बंद राहणार आहे. पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा यासाठी प्रशासनाच्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. जेसीबी, पोकलेन आणि इतर यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. गरज भासल्यास मदतीसाठी लष्करालाही सतर्क करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे