न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

विसापूर किल्ल्याखालील दरड घरावर कोसळून तिघांचा मृत्यू

पुणे /वृत्तसंस्था 

विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या मावळ तालुक्यातील पाटण गावात आज सोमवारी (६ जुलै) पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत संपुर्ण कुटुंब गाडले गेले होते, ज्यापैकी तीन मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, मावळातील पाटण गावात पहाटे 4.25 वाजता चार घरांवर डोंगरकडा कोसळले. यामध्ये  30 ते 35 लोक अडकले होते. परंतू एकाच घरातील तीन जण मृत्यूमुखी पडले आहेत. नंदू तिकोने (वय 60). माऊली तिकोने (वय 30) अनिता तिकोने (वय 55) एनडीआरएफ टीम कडून दोन मृतदेह काढण्यात आले आहेत. मलबा हटवण्याचे काम अजूनही सुरू आहे. तिसरा महिलेचा मृतदेह शोध सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे