सावंतवाडीत आत्मेश्वर मंदीरावर झाड कोसळले
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी
वादळी पावसामुळे सावंतवाडीत येथील प्रसिद्ध आत्मेश्वर मंदिराजवळ असलेले एक जुने, भलेमोठे आंब्याचे झाड अचानक कोसळल्याची घटना घडली. हे झाड थेट आत्मेश्वर मंदिराच्या छपरावर पडल्याने छपराच्या काही भागाचे मोठे नुकसान झाले. झाड कोसळले, त्याच वेळी मंदिराच्या आवारात एक पिकअप व्हॅन उभी होती. हे झाड त्या वाहनावरही कोसळले.


