न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक मदतीचा हात’

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

    तळवडे येथील रहिवासी शामसुंदर मालवणकर हे किडनीच्या आजाराने त्रस्त असून, सध्या मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा हात पुढे करत भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या तर्फे त्यांना आर्थिक मदत करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णाला मदत करण्याचा हा उपक्रम भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक मदतीचा हात’ या भावनेतून करण्यात आला.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादा आगर वाडेकर, सुभाष कुंभार, तळवडे गावचे उपसरपंच गौरव मेस्त्री तसेच बाळा जाधव उपस्थित होते. गरजू व्यक्तीच्या अडचणीच्या काळात मदतीसाठी पुढे येत सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे