न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस दिनी दिव्यांग बांधवांना आधाराचा हात

 

सिंधुदुर्ग  राजू तावडे 

    महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकाराने तसेच सावंतवाडी विधानसभा भाजपा यांच्या वतीने अंध, अपंग व दिव्यांग बांधव-भगिनींना आधाराच्या काठ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून सामाजिक कार्यातून मिळणारे खरे समाधान अनुभवायला मिळाले. समाजातील गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, “दिव्यांग बांधवांसाठी हे जनसंपर्क कार्यालय कायम खुले राहील. तुम्ही केव्हाही हाक द्या, तुमच्या अडचणीच्या काळात मी तुमच्यासाठी कायम उपलब्ध राहीन.” या शब्दांतून त्यांनी दिव्यांग बांधवांना आधाराची ग्वाही दिली.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर ॲड. सिद्धार्थ भांबूरे, गोविंद साटेलकर, बंटी जामदार उपस्थित होते.

यावेळी प्रसन्ना देसाई यांनी सांगितले, विशालज परब यांच्या पत्नीने सुद्धा यावर्षी आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा न करता दिव्यांग बांधवांसोबत साजरा केला. यातून परब परिवाराचा दिव्यांग बांधवांप्रती असलेला जिव्हाळा, आपुलकी आणि सामाजिक बांधिलक दिसून येते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे