न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आमदार निलेश राणे यांनी घेतले संजू परब यांच्या गणरायाचे दर्शन

 

सिंधुदूर्ग / राजू तावडे 

 शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांच्या मडुरे-परबवाडी येथील निवासस्थानी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार श्री. निलेश राणे यांनी रविवारी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी श्री. निलेश राणे यांनी गणरायाची मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेव्हियर फर्नांडिस,युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस,मडूरे सरपंच उदय चिंदरकर,त्याच प्रमाणे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परब कुटुंबीय व स्नेही उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे