प.पू. टेंबे स्वामींची ११२ वी पुण्यतिथी उत्सव उत्साहात सुरू… गडहिंग्लज आगाराची माणगाव बस सुरू
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
श्रीदत्त सांप्रदायातील थोर संत प.पू. टेंबे स्वामी महाराज यांची ११२ वी पुण्यतिथी उत्सव आज श्री जन्म गावी अर्थात माणगावी साजरा होत आहे.
आज सकाळी जन्मस्थानी पुजा, अभिषेक करण्यात आला. यावेळी काशीवरून अतिथी आले होते. जन्म घरात पुजा, होम घालण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर दत्त मंदिर येथेही मोठी गर्दी जमली होती. गोवा ते शिंगणापूर पायी यात्रेला जाणारे भक्तही आले होते.
दरम्यान श्री क्षेत्र माणगावी येण्यासाठी आता कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज आगारातून माणगावला एस.टी. बस प्राथमिक स्वरूपात सुरू करण्यात आली आहे. हि बस आजरा, आंबोली, सावंतवाडी,अशी धावणार आहे.



